Friday 6 November 2015

खाता-खाता वजन कमी करण्याचे 5 उपाय




नको असलेले फॅट कमी करण्यासाठी वाटेल ते करण्याची लोकांची धडपड असते. जॉगिंग, जिम, डायेटिंग इ. उपचार करूनसुध्दा
वजन कमी होत नाही ही तक्रार अनेकजण करतात. पण लक्षात ठेवा, डायेटींग म्हणजे कमी खाणे असा गैरसमज अनेकजण
करतात आणि वजन कमी करायच्या नादात अशक्तपणा व इतर आजारांना ते आमंत्रण देत असतात हे कित्येकांच्या लक्षात
देखिल येत नाही. म्हणूनच खाता-खाता वजन कमी करायचे ५ नामी उपायांची ही यादी..
1. पुरेपूर पण उपयोगी नाष्टा करा :
सकाळचा नाष्टा आहारातील एक प्रमुख घटक आहे. भरपूर नाष्टा करा पण लक्षात असू द्या. चिप्स, केक्स असे कॅलरीज व फॅट वाढवणारे पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी प्रोटिनयुक्त पदार्थ खा. पाणी पिण्याचे महत्व सांगितले आहेच तेव्हा उठल्यावर प्रथम लिंबूपाणी प्यायचे विसरू नका.

2. ठराविक ब्रेकनंतर वारंवार खा- प्रमाण मात्र कमी :
डायेटींग म्हणजे आवडती डिश, पदार्थ खायचे बंद असाही गैरसमज आहे. तुम्हाला आवडती डिश तुम्ही खायचे सोडू नका. पण आहार तज्ञांच्या मते तुम्ही एक फूल प्लेट एखादा पदार्थ खात असाल तर आर्धी प्लेट खायला सुरू करा. दोन खाण्याच्या मध्ये साधारणपणे दोन-तीन तासांचे अंतर ठेवा. आपण भारतीय फक्त दोन जेवण, पण भरपूर जेवण करतो. तसे न करता जास्त वेळ खा पण कमी प्रमाणात.

3. कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थ टाळा :
स्टार्चयुक्त पदार्थ, उदा. भात, बटाटे इ. टाळा. अतिगोड पदार्थ कार्बोहायड्रेट वाढवतात. खाण्यातील तेलाचे पदार्थ कमी करून शरिराची प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करणारे पदार्थ खा. लक्षात असुद्या बरेचसे जंकफूड आपल्या शरीरातील फॅट वाढवताट. आणि जंकफूडमध्ये कार्बोहायड्रेटयूक्त घटकाचा भरपूर वापर असतो.
तर स्टे अवे फ्रॉम जंकफूड.

4. भरपूर पाणी प्या :
खाण्याबरोबर पाण्याचेही आहारात फार महत्त्व आहे हे लक्षात असू द्या. पाण्यामध्ये कॅलरीज नसतात, शिवाय भूक कमी लागण्यास पाण्याचा उपयोग होतो. दररोज २-३ लिटर पाणी तुम्हाला वजन आटोक्यात ठेवायला मदत करेल. किती पाणी तुम्ही रिचवले हे लक्षात राहत नसेल तर सोपा उपाय – आधीच बाटल्या भरून ठेवा आणि मग मोजा पोटात किती गेले ते….

5. पूरेपूर झोप घ्या :
ताण-तणावामुळेसुध्दा वजन वाढते. शरिराला आहाराबरोबरच झोपेची ही गरज असते. कमी झोप असणाऱ्यांची भूक जास्त असते असे दिसून आले आहे. तेव्हा शरिराला आराम द्या, पूरेपूर झोप घ्या. आणि पहा खाता खाता वजन कमी कसे होते ते.
तर दोस्तांनो जरूर कळवा आर्टिकल कसे होते ते आणि काही उपयोग झाला का?

No comments:

Post a Comment